श्रीराम नवमीच्या उत्सवादरम्यान, उत्तर-मध्य मुंबई लोकसभेच्या वतीने मुंबईतील सर्वात मोठी मिरवणूक काढली

१७ एप्रिल २०२४ रोजी, श्रीराम नवमीच्या उत्सवादरम्यान, उत्तर-मध्य मुंबई लोकसभेच्या वतीने मुंबईतील सर्वात मोठी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत भगवान श्री राम मंदिर, श्री मुंबादेवी मंदिर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतींचा समावेश होता. शिवसेना सचिव श्री. संजय मोरे, आमदार श्री. दिलीप मामा लांडे, शिवसेना उपनेत्या सौ. कला ताई शिंदे, युवासेना सचिव श्री. राहुल कानल, शिवसेना विभागप्रमुख श्री. कुणाल सरमळकर यांच्यासह शिवसैनिक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.