महायुतीचा निर्धार मेळावा..!

कुर्ला विधानसभेत महायुती पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. महायुतीच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येत उपस्थिती दाखवून मेळाव्याला उत्तम प्रतिसाद दिला. महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत महायुतीच्या उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करावे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी भा.ज.प. मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार श्री. आशिष शेलार, शिवसेना संपर्क प्रमुख सौ. वीणाताई भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागीय कार्याध्यक्ष श्री. नरेंद्र राणे, भा.ज.प. माजी नगरसेवक श्री. सुषम सावंत, भा.ज.प मुंबई महामंत्री सदस्य श्री. अमित शेलार, भा.ज.प माजी नगरसेवक श्री. राजेश फुलवारीया, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. अर्शद अमीर, राष्ट्रवादी काँग्रेस कुर्ला तालुका अध्यक्ष श्री. चंदन पाटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई सरचिटणीस श्री. प्रमोद पाटील, आर. पी. आय जिल्हा अध्यक्ष श्री. साधूजी कटके, भा.ज.प. कुर्ला तालुका अध्यक्ष श्री. संजय जाधव, रा.स.पा. युवा अध्यक्ष श्री. अजित लाडे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.