मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली कुर्ला विधानसभेतील सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी येथे सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली. मान्सूनपूर्व नाले सफाईचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी महापालिकेला दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, पालक मंत्री- मुंबई शहर श्री. दीपक केसरकर साहेब व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगराणी साहेब आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *