नागरिकांशी थेट संवाद थेट समाधान

कुर्ला विधानसभेमधील नागरिकांना असलेल्या विविध समस्यांबाबत संवाद साधण्यासाठी गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी संत ज्ञानेश्वर सभागृह केदारनाथ मंदिर जवळ नेहरू नगर कुर्ला पूर्व येथे सायंकाळी ६:३० वा. नागरिकांशी थेट संवाद थेट समाधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संवादाच्या कार्यक्रमात आपण सर्व नागरिकांच्या विविध समस्यांना सोडवण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ.

आपल्या विभागातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, चाळीच्या पदाधिकाऱ्यांना, विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच नागरिकांना सदर संवादात सामील होण्याचे मी आवाहन करत आहे.

आपला,
मंगेश कुडाळकर,
शिवसेना आमदार विभाग प्रमुख