कुर्ला विधानसभेमधील विविध प्रश्नांवर महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ ५) श्री. हर्षल काळे यांच्या दालनात बैठक

कुर्ला विधानसभेमधील विविध प्रश्नांवर महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ ५) श्री. हर्षल काळे यांच्या दालनात बैठक

कुर्ला विधानसभेमधील महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करण्यासाठी महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ ५) श्री. हर्षल काळे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.
१) स. गो. बर्वे मार्गावरील पूर्णत्वास आलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत रस्त्याचा पीछेहाट महानगरपालिकेने हस्तांतरित करून रस्ता रुंदीकरण करण्याबाबत.
२) टिळक नगर येथील अग्निशमन केंद्राच्या बांधकामाच्या बाबत तातडीने कारवाई करण्याबाबत.
३) ठक्कर बाप्पा, वत्सला ताई नाईक नगर, क्रांतीनगर साबळे नगर, संतोषी माता नगर, ताकीया वॉर्ड या ठिकाणी साफसफाई व गटाऱ्यांची साफसफाई योग्यरित्या होण्याबाबत.
४) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ज्या प्रभागात अद्याप सुरू झालेला नाही त्या प्रभागात लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.
५) नेहरूनगर व टिळक नगर या वसाहतीतील मलनि:सारण वाहिनीच्या उन्नती करण्याच्या कामाला वेग मिळण्याबाबत.