अथक प्रयत्नांना यश..

अथक प्रयत्नांना यश..

टिळक नगर म्हाडा वसाहतीमध्ये अग्निशमन करिता आरक्षित असलेल्या भूखंडावर मिनी अग्निशमन केंद्र बनण्याकरिता म्हाडा कडून महानगरपालिकेस भूखंड हस्तांतरण करण्याकरता सततच्या पाठपुराव्यास यश आले आहे.

म्हाडा प्राधिकरणाने महानगरपालिकेत अग्निशमन केंद्राकरिता आरक्षित असलेला भूखंड हस्तांतरित केला आहे.

तसेच महानगरपालिका उपायुक्त श्री हर्षल काळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीदरम्यान सदर भूखंडावर तात्काळ अग्निशमन केंद्र उभारण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.